"ग्रामसेवकांसाठी निविदा व्यवस्थापनाचे डिजिटल समाधान – GPTenders.in"
निविदा कागदपत्रांचे सखोल पुनरावलोकन आणि विश्लेषण.
निविदा कागदपत्रांची कार्यक्षम आणि व्यावसायिक तयारी.
संबंधित निविदा आणि अंतिम मुदतींबद्दल वेळेवर अद्यतने.
जिंकण्याच्या बोली धोरणे तयार करण्याबाबत तज्ञांचा सल्ला.
सर्व कायदेशीर आणि प्रक्रियात्मक अनुपालन पूर्ण होत आहे याची खात्री करणे.
निविदा सादर केल्यानंतर सतत पाठिंबा.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विशेषतः ग्रामपंचायत स्तरावर विकास कामांची निविदा प्रक्रिया सुसंगत, पारदर्शक व कायदेशीर मार्गाने राबविणे ही काळाची गरज बनली आहे. सध्याच्या डिजिटल युगात ही प्रक्रिया तांत्रिक व व्यवस्थापकीय दृष्टीने अधिक सक्षम व्हावी, यादृष्टीने gptenders.in या पोर्टलची संकल्पना विकसित करण्यात आली आहे.
“ सक्षमता हीच सुरक्षितता ” या तत्त्वावर आधारलेले हे पोर्टल ग्रामपंचायत अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी यांना निविदा प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर आवश्यक त्या कायदेशीर मार्गदर्शनासह, तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देते. निविदा प्रक्रिया अधिक सुसूत्र व विश्वासार्ह बनविण्यासाठी, तसेच विकास कामांचे व्यवस्थापन अधिक पारदर्शक व सुलभ करण्याच्या हेतूने हे पोर्टल प्रभावीपणे कार्यरत आहे.
‘निविदा सहाय्यक पोर्टल’
gptenders.in पोर्टलच्या माध्यमातून निविदा प्रक्रियेतील विविध कार्यपद्धती – कामाची निवड करणे, निविदा प्रक्रिया करणे,कामाची देयके अदा करणे, शासकीय कपाती करून त्याचा योग्य त्या खात्यामध्ये भरणा करणे, तांत्रिक व आर्थिक अहवाल तयार करणे, पोर्टलवर तयार होणाऱ्या रिपोर्ट्सच्या माध्यमातून गावातील विकास कामांचा आढावा घेणे या सर्व बाबी सुबोध, शिस्तबद्ध व कायदेशीर पद्धतीने पार पडतात. शिवाय, सर्व प्रक्रिया व त्यासंबंधित दस्ताऐवजांचे अभिलेखन संगणकीकृत पद्धतीने कायमस्वरूपी जतन केले जाते.
या पोर्टलचा प्रभावी वापर करून ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या कार्यामध्ये आत्मविश्वास, कार्यक्षमता व पारदर्शकता प्राप्त होईल, असा विश्वास आहे.
"प्रत्येक निविदा, प्रत्येक देयक – व्यवस्थित, पारदर्शक आणि सुरक्षित!"
gptenders.in या पोर्टलवर ऑफलाईन / बी १ / पेपर निविदा व ई निविदा फाईल अगदी कमी वेळात आणि कमी त्रासात तयार करता येईल. gptenders.in वर कंत्राटदार निविदा फॉर्म मागणी अर्ज, त्यांचे विविध घोषणापत्रे, कामाचा b-1 फॉर्म, लिफाफा कव्हरिंग, विविध टप्प्यातील बिल / बायना/ सुरक्षा ठेव / अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणी अर्ज आपोआप तयार होतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात वेळ वाचतो.
निविदा प्रक्रियेशी संबंधित सर्व डेटा gptenders.in या पोर्टलच्या सर्वरवर कायमस्वरूपी सुरक्षित राहील. निविदा प्रक्रियेशी संबंधित सर्व डेटा पोर्टलवर अपलोडची सुविधा आहे. तो पोर्टलच्या सर्वरवर कायमस्वरूपी सुरक्षित राहणार आहे. त्यामुळे भविष्यात त्या कामाची मुळ फाईल जरी नाही सापडली तरी त्या फाईलमधील पोर्टल वापरणाऱ्याने अपलोड केलेले व पोर्टलद्वारे तयार झालेले सर्व कागदपत्रे पोर्टलवर मिळतील.
gptenders.in पोर्टल निविदेच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक त्या सूचना देऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यास मार्गदर्शन करेल.गरजेनुसार मार्गदर्शक नमुनेही उपलब्ध केलेले आहेत. लेखापरीक्षणात किंवा तपासणीत येणारा तारखांचा गैरमेळ होणार नाही यासाठी gptenders.in पोर्टल सूचनाद्वारे वेळोवेळी सावध करेल.
gptenders.in या पोर्टलवर भरलेल्या माहितीच्या आधारावर योजनानिहाय, कंत्राटदारनिहाय, निविदा प्रकारनिहाय कामांचे अहवाल (रिपोर्ट) प्रिंट मिळण्याची सुविधा आहे.अहवाल (रिपोर्ट) ग्रामपंचायत अधिकारी यांना आढावा सभा आणि कामाच्या सनियंत्रणासाठी उपयुक्त नक्की उपयुक्त ठरणार आहेत.
gptenders.in पोर्टलवर कायदेशीर कार्यपद्धती निर्देशित केली आहे, त्याचबरोबर आवश्यकतेनुसार लवचिकताही ठेवण्यात आली आहे.
gptenders.in हे ऑनलाइन पोर्टल असल्याने ते कधीही, कुठूनही वापरता येईल.
कर कपातीचे रिटर्न दाखल करण्यासाठी आवश्यक असलेल्या नमुन्यात माहिती मिळेल. तसेच, ज्या कपातीचे रिटर्न अपेक्षित नाहीत त्याचे वार्षिक अहवालही उपलब्ध आहेत. प्रत्येक कामाच्या शासकीय कपाती निर्देशित केल्या जातील आणि त्या विहित खात्यात भरणा केल्याच्या नोंदी व भरणा चलने अपलोड करण्याची सुविधा असेल, ज्यामुळे लेखापरीक्षणासाठी वेळेत माहिती उपलब्ध होईल. gptenders.in वर सुरक्षा ठेवीची टक्केवारी ग्रामपंचायतीने निश्चित केलेनंतर होणारी सुरक्षा ठेव व बयाना रक्कम याची मोजणी केली जाते.अतिरिक्त सुरक्षा ठेव व स्टेम्प ड्युटी रक्कम पोर्टलद्वारे नियमानुसार निश्चित करून दिली जाते.करकपाती पद्धतीच्या निवडीनुसार कामाच्या एकूण बिलातून कपात करायच्या करकपाती स्पष्ट होतात त्यामुळे कंत्राटदाराला जादा बिल अदा होण्याचा धोका टळतो. gptenders.in वर विमा संचलनालय पत्र, लेबर सेस चलन ऑटो जनरेट होते फक्त स्वाक्षरी करून व धनादेशाद्वारे भरणा केला कि ती कार्यवाहीदेखील पूर्ण होते.इतर कर भरणा करण्याची सोपी कार्यपद्धती देखील सपष्ट केली आहे.
कंत्राटदारांना देयक (बिल) अदा करताना कोणतीही चूक होऊ नये यासाठी gptenders.in पोर्टलवरील देयक तपासणी सूचीचा वापर केल्यास ग्रामसेवकाची नोकरी नक्कीच तणावमुक्त होईल. पोर्टलवर तयार केलेल्या फाईलच्या संदर्भात देयकाच्या वेळी वरिष्ठ कार्यालयाकडून त्रुटी निघून अडवणूक होण्याचा धोका टळतो व कंत्राटदार / ग्रामपंचायत यांना मनःस्ताप होणार नाही. gptenders.in हे निविदा सहायक पोर्टल ग्रामपंचायत अधिकारी यांना निविदा प्रक्रियेतील क्लिष्टता कमी करून, त्यांना अधिक कार्यक्षम आणि तणावमुक्त बनवण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे. gptenders.in या पोर्टलमुळे शासनाचा महराष्ट्रातील बेरोजगारीवरील उपाययोजनेसंदर्भातील ease of doing business हा हेतू साध्य होईल.
महाटेंडर पोर्टलवरील ई-निविदा प्रक्रियेतील निविदा नोटीसपासून तांत्रिक छाननी पर्यंतची प्रक्रिया ऑफलाईनच करूनच ऑनलाइन करावी लागते.पोर्टलवर कंत्राटदार यांनी भरलेले दराचा तुलनात्मक तक्ता अंतिम होऊन L -1 / निम्नतम दराचा कंत्राटदार निश्चित होऊन मिळतो त्यापुढील कार्यारंभ आदेश पासून शासकीय कपाती व देयक अदा करेपर्यंतचे सर्व प्रकिया ऑफलाईनच करावी लागते ती आपल्याला gptenders.in या पोर्टलवर अगदी सोप्या व कायदेशीर पद्धतीने पार पाडण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे.
Nagala Park, Kolhapur, Maharashtra, India
+91-7397983600
info@gptenders.com
Contact via WhatsApp